Tue, Jun 25, 2019 21:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात क्लस्टरमुळे १३५ हेक्टर जागा मोकळी

ठाण्यात क्लस्टरमुळे १३५ हेक्टर जागा मोकळी

Published On: Apr 29 2018 2:39AM | Last Updated: Apr 29 2018 2:11AMठाणे : प्रवीण सोनावणे 

ठाणे शहरात राबवल्या जाणार्‍या क्लस्टर योजनेमुळे केवळ मोठ्या प्रमाणात घरांचीच निर्मिती होणार नसून मोकळी जागा आणि रस्त्यांचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे. क्लस्टर योजनेनंतर 135.30 हेक्टर मोकळे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे, तर 307.46 रस्त्याचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आल्याने शहरातील अतिक्रमित झालेली जागा मोकळी होणार असून रस्त्यांचे जाळेदेखील वाढणार आहे. 

सध्या ठाणे शहरात 22.01 हेक्टर मोकळी जागा अस्तित्वात असून विकास आराखड्याप्रमाणे 69.75 हेक्टर क्षेत्र मोकळे असायला हवे होते, तर 105.05 हेक्टर रस्त्याचे क्षेत्र सध्या अस्तित्वात असून विकास आराखड्याप्रमाणे 248.31 हेक्टर रस्त्याचे क्षेत्र असणे अपेक्षित होते. 

दुसरीकडे क्लस्टर योजनेमुळे औद्योगिक क्षेत्र मात्र कमी होणार आहे. सध्या 54.61 औद्योगिक झोन अस्तित्वात असून विकास आराखड्याप्रमाणे तो 46 हेक्टर असणे अपेक्षित आहे,  मात्र क्लस्टर योजनेअंतर्गत मात्र 23.05 हेक्टर क्षेत्र विकसित केले जाणार आहे.  पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वी क्लस्टर योजनेचे सादरीकरण केल्यानंतर ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत देखील क्लस्टर योजनेचे सुधारित सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये युआरपीची संख्या एकने वाढली असून ही संख्या आता 44 झाली आहे. 

सुधारित क्लस्टरमध्ये अनेक ठिकाणी सुविधांचा समावेश करण्यात आला असून सांस्कृतिक केंद्रे उभारण्याबरोबर प्रत्येक क्लस्टरमध्ये मार्केटची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. ठाणे शहरात विकास आराखड्याची  विशेष म्हणजे क्लस्टर योजनेमुळे शहरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमित झालेली मोकळी जागा अतिक्रमणापासून मुक्त होणार आहे. 

Tags : Mumbai, mumbai news, 135 acres, cluster in Thane, free space,