Fri, Sep 20, 2019 06:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मानखुर्दमध्ये तेरा वर्षीय मुलीची आत्महत्या

सांडलेले पाणी पुसायला सांगितल्याने तेरा वर्षीय मुलीची आत्महत्या

Published On: Aug 22 2019 9:04AM | Last Updated: Aug 22 2019 9:04AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : प्रतिनिधी

घरात सांडलेले पाणी साफ करायला सांगितल्याच्या रागातून तेरा वर्षीय मुलीने राहात्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये उघडकीस आली आहे. सकिना नुरमहम्मद कुरेशी असे मृत मुलीचे नाव असून घटनेची नोंद करून मानखुर्द पोलिस तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी सकिना ही आई-वडीलांसोबत मानखुर्दमध्ये राहात होती. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी पाणी भरुन झाल्यावर तिच्या आईने तिला घरात सांडलेले पाणी साफ करायला सांगितले. याचा राग येवून तिने गळफास घेत आपले आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 

घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, सकीनाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवत तपास सुरु केला. सकीनाच्या कुटुंबियांच्या चौकशीत ती तापट स्वभावाची असल्याने तिला लगेच राग यायचा, यातूनच तिने हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex