Tue, Aug 20, 2019 15:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पकडलेली १३ कोटीची दारू करणार नष्ट

पकडलेली १३ कोटीची दारू करणार नष्ट

Published On: Apr 24 2019 1:40AM | Last Updated: Apr 24 2019 1:29AM
नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात 40 सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 11 मार्च ते 22 एप्रिलपर्यंत 13 कोटी कोटी 53 लाखांची दारू जप्त केली. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने 6616 गुन्हे दाखल केले आहेत. जप्त केलेला हा मद्यसाठा न्यायालयाच्या निर्णयानंतर नष्ट केला जातो. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली. 

लोकसभेची आचारसंहिता लागू होताच राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 40 सीमा तपासणी नाक्यांवर सुक्ष्म भरारी पथकामार्फत 13 कोटी 53 लाखांची दारू जप्त केली. या कालावधीत 6616 गुन्हे दाखल करुन 4567 व्यक्तींना आरोपी केले गेले. या काळात 1 लाख 784 लीटर हातभट्टीची दारू, 20.31 लाख लीटर दारू तयार करण्याचे रसायन, 54.277 लीटर  देशी-विदेशी मद्य, स्पिरीट आणि 43 हजार 178 लीटर ताडीचा साठा जप्त केला. या धडक कारवाई मोहिमेत 527 वाहने ही जप्त केली. 

जप्त केलेला मद्यसाठा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येतो. तो अहवाल न्यायालयासमोर सादर केला जातो. या अहवाल दारू बनावट आहे की नाही याची तपासणी केली जाते. अल्कोहोलचे प्रमाण किती आहे. हे निष्पन्न होते अशी माहिती या विभागातील अधिकारी सनिल चव्हाण यांनी दिली.  हायभट्टी, गावठी दारू आणि रसायन हे जप्त केल्यानंतर जागेवरच नष्ट केले जाते. त्याची वाहतूक करता येत नसल्याने अशा पध्दतीने कारवाई केली जात असल्याचे सुनिल चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

उत्पादन शुल्क विभागाने आयुक्त प्रजाक्ता लवंगारे-वर्मा यांच्या आदेशाने मद्य उत्पादक आणि घाऊक विक्रेत्यांच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले. 23 एप्रिल रोजी मतदान होण्याच्या एक दिवस आधी सर्व विभागीय उपआयुक्त व अधीक्षकांना सीमा तपासणी नाक्यावरुन अवैध मद्याची वाहतूक होणार नाही, यासाठी नाकेबंदीचे आदेश देण्यात आले होते. उत्पादन शुल्क विभागात दोन उपायुक्त दर्जाच्या दोन अधिकार्‍यांची खास नियुक्ती व निगराणी ठेवण्यासाठी मुख्यालयात करण्यात आली आहे.