Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीच्या दुसऱ्या यादीचे वाजले बारा

अकरावीच्या दुसऱ्या यादीचे वाजले बारा

Published On: Jul 16 2018 1:02PM | Last Updated: Jul 16 2018 1:02PMमुंबई: प्रतिनिधी

अकरावी प्रवेशाची आज ११ वाजता जाहीर होणारी यादी अचानक पुढे ढकलली आहे. आता ही यादी १९ जुलै रोजी ११ वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यादी पुढे ढकलण्याचे तांत्रिक कारण पुढे केले आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश राज्यात सुरू आहेत. 5 जुलै रोजी पहिली यादी जाहीर झाली, त्यानंतर पावसामुळे दोन दिवस प्रवेश लांबल्याने दुसऱ्या यादीचे वेळापत्रक पुढे ढकलले. सोमवारी जाहीर होणारी यादी अचानकपणे पुढे ढकलली आहे.