Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीचे प्रवेश घेताना; सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर!

अकरावी प्रवेश: सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर!

Published On: May 29 2018 1:19PM | Last Updated: May 29 2018 1:21PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईसह एमएमआर क्षेत्रात अकरावी ऑनलाईन प्रवेशांसाठी असलेले संकेतस्थळ खुले करण्यात येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीत नोंदणी अर्ज भरता यावेत यासाठी संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यातील प्रवेशही ऑनलाईन होणार असल्याने अकरावीचा अर्ज सर्व विद्यार्थ्यांना भरावा लागणार आहे. प्रवेश कोणत्याही कोट्यातून घेणार असाल तरी त्या विद्यार्थ्यांला ऑनलाइन अर्ज दाखल करणे अनिवार्य असणार आहे.

मार्गदर्शन तसेच शाळेत विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका मिळाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी पुस्तिकेसोबत आलेला लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून संकेतस्थळावर आपले प्रोफाईल तयार करावे. त्यानंतर शक्यतो आपला पासवर्ड बदलून पुढील प्रक्रियांचा विचार करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

अकरावीचा ऑनलाइन प्रवेश अर्ज दोन भागात विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या मदतीने तसेच पालकांच्या मदतीने आपल्या अकरावी प्रवेशाचा वैयक्तिक माहितीचा पहिला भाग संकेतस्थळावर ऑनलाइन भरून घ्यावा. दुसरा भाग (पसंतीक्रम) हा विद्यार्थ्यांसाठी एसएससी मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच संकेतस्थळावर सुरू होणार होईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी दुसर्‍या भागाचा (पसंतीक्रम) सराव माहिती पुस्तिकेतील नमुना प्रवेश अर्जाच्या मदतीने भरावा लागणार आहे. नोंदणी अर्ज दाखल केल्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे. नामवंत असो...वा कमी कटऑफ असणारे महाविद्यालय त्या महाविद्यालयांच्या मागील वर्षीच्या कट ऑफ गुणांसह प्राधान्यक्रमांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे महत्वाचे असणार आहे. यासाठी हे पुढारी कॅम्पस मधून खास मार्गदर्शन...

ग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करून घ्या

राज्य मंडळाच्या मार्च 2018 मध्ये प्रथमतः परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्ह लागू आहे. सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये पाच विषय असतात त्यामुळे त्यांचे एकूण गुण 500 पैकी टाकावेत. आयसीएसई. मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये तीन ग्रुप असतात. ज्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्ह घ्यावयाचे असेल अशा विद्यार्थ्यांनी ग्रुप 1 व ग्रुप 2 मधील विषयांच्या गुणांची बेरीज करून 500 पैकी गुण टाकावेत, यामध्ये ग्रुप 3 च्या विषयाचे गुण घेवू नये. जर बेस्ट ऑफ फाइव्ह घ्यावयाचे नसेल अशा विद्यार्थ्यांनी दहावीमधील सर्व विषयांच्या गुणांची बेरीज करून ते गुण प्रवेश अर्जामध्ये नमूद करावेत. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट ऍव्हरेज (सीजीपीए) पद्धतीने दिले जातात. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुणांऐवजी श्रेणी दिली जाते. त्यामुळे अन्य राज्यांतून मुंबईत प्रवेशासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांद्वारे बोर्डाकडून गुण रूपांतरित करून घ्यावे लागतात. या ग्रेडचे गुणांमध्ये रुपांतर करून घेतल्यानंतर हे गुण विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जामध्ये नमूद करायचे आहेत आणि प्रवेश अर्जाचा भाग-1 भरल्यानंतर तो अप्रुव्ह करून घायची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

ग्रेडचे गुणांमध्ये रूपांतर करून घेण्यासाठी केंद्र
 
> राजहंस विद्यालय, अंधेरी (प) आर. एन. पोद्दार स्कूल, सांताक्रूझ (प.)
> एपीजे स्कूल, सेक्टर-15, नेरूळ, नवी मुंबई
> डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, प्लॉट नं.11, सेक्टर 10, ऐरोली, नवी मुंबई
> लोकपूरम पब्लिक स्कुल, ठाणे (प)

ऑनलाइन प्रवेशाची माहिती पुस्तिका कुठे मिळेल?

ऑनलाइन प्रवेश क्षेत्रातील माध्यमिक शाळेतून मार्च 2018 च्या दहावीच्या परीक्षेत प्रविष्ठ झाला आहे. त्या शाळेतच ऑनलाइन प्रवेशाची माहितीपुस्तिका मिळणार आहे. सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांना ऑनलाइन प्रवेशाच्या माहितीपुस्तिकेचे वितरण शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे. ऑनलाइन प्रवेश क्षेत्राबाहेरील कोणत्याही शाळेतून मार्च 2018 किंवा त्यापूर्वी झालेल्या दहावीच्या परीक्षेत प्रविष्ठ किंवा उत्तीर्ण झाला असेल ऑनलाइन प्रवेशाची माहितीपुस्तिका मार्गदर्शन केंद्रावरून प्राप्त करून घ्यावी. मार्गदर्शन केंद्रांची यादी व इ. 11 वी ऑनलाइन प्रवेशाची माहितीपुस्तिका https://mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावर Latest Notifi cation या शिर्षकाखाली अपलोड केलेली आहे. विद्यार्थ्यानी या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या नजीकचे मार्गदर्शन पाहून ऑनलाइन प्रवेशाची माहितीपुस्तिका प्राप्त करून घ्यावी.

No automatic alt text available.

प्रवेशअर्ज ऑनलाइन कसा सादर करावा ? 

> विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिका प्राप्त केल्यानंतर लॉगीन आय. डी. व पासवर्ड https://mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावरील Student Login या ऑप्शन क्लीक करून तेथे माहितीपुस्तीकेतील लॉगीन आय. डी. व पासवर्ड टाकावा. 

> मुंबई महानगरक्षेत्रातील माध्यमिक शाळेतून दहावीची परीक्षा दिली असेल तर OMMR ऑप्शन क्लीक करावे. विद्यार्थी जर मुंबई महानगरक्षेत्राबाहेरील माध्यमिक शाळेतून इ. 10 वीची परीक्षा दिली असेल तर जचचठ ऑप्शन क्लीक करावे. विद्यार्थी जर महाराष्ट्राक्षेत्राबाहेरील माध्यमिक शाळेतून इ. 10 वीची परीक्षा दिली असेल तर OMS ऑप्शन क्लीक करावे.

> विद्यार्थ्याने जर मार्च 2018 मध्ये पहिल्यांदाच दहावीची परीक्षा दिली असेल तर Fresher या ऑप्शन क्लीक करावे. विद्यार्थ्याने जर मार्च 2018 मध्ये दुसर्‍या, तिसर्‍या किंवा त्यापेक्षा अधिकच्या प्रयत्नात दहावीची परीक्षा दिली असेल तर Repeater या ऑप्शन क्लीक करावे. 

> विद्यार्थ्याने दहावीची राज्य मंडळाची परीक्षा दिली असेल तर ssc, सी.बी.एस.ई. मंडळाची असेल तर CBSE,आय.सी.एस. ई. मंडळाची असेल तर ICSE, आय.बी. मंडळाची असेल तर I.B या ऑप्शनला क्लीक करावे. जर विद्यार्थ्याने इतर मंडळाची दहावीची परीक्षा दिली असेल तर Other Board या ऑप्शन क्लीक करून दहावीच्या परीक्षेच्या मंडळाचे नाव नमूद करावे.

Image result for Online Admissions

> विद्यार्थाने राज्य मंडळाची दहावीची परीक्षा मार्च 2018 मध्ये दिली असेल तर त्यांनी आपला बैठक क्रमांक टाकल्यानंतर त्यांना त्यांची निकालापूर्वीची वैयक्तिक माहिती आपोआप दिसेल. ती माहिती विद्यार्थ्याने पडताळून पहाणे आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांच्या नावाच्या स्पेलिंग, लिंग, जन्मदिनांक, जात संवर्ग यामध्ये काही बदल असल्यास विद्यार्थ्याने अगोदर आपला संपूर्ण अर्ज भरावा. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्याने परत Student Login या ऑप्शनला क्लीक करून आपल्या लॉगीन आय.डी. मध्ये Request Correction या ऑप्शन क्लीक करून ज्या माहितीमध्ये बदल आहे. त्या ऑप्शनसमोरील चेकबॉक्सवर क्लीक करून Save करावे. Save या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना संगणकावर एक मेसेज येतो कि, आपली विनंती तात्पुरती मान्य करण्यात आली आहे, ती वेरीफाय करण्यासाठी आपल्या माध्यमिक शाळा / मार्गदर्शन केंद्राला संपर्क साधून योग्य ती कागदपत्रे दाखवून आपला प्रवेश अर्ज व्हेरीफाय करून घ्यावा. विद्यार्थ्याने आपल्या प्रवेश अर्जाच्या भाग -1 मधील पेंडिंग स्टेटसचे अप्रुव्हल करून घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-1 मधील पेंडिंग स्टेटसचे अप्रुव्हल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-2 सुरु होणार नाही. (राज्य मंडळाच्या निकालानंतर प्रवेश अर्जाचा भाग-2 सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येतो.)

> राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना बैठक क्रमांकापासूनची सर्व माहिती स्वत:ला भरावी लागणार आहे.

> सामाजिक व आणि वैधानिक आरक्षणाचा लाभ घेवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश अर्जामध्ये आपणास लागू असलेले आरक्षण नमूद करावे. विद्यार्थ्याने आपल्या प्रवेश अर्जाच्या भाग -1 मधील पेंडिंग स्टेटसचे अप्रुव्हल करून घेण्यासाठी संबधित शाळा / मार्गदर्शन केंद्रावर प्रत्यक्ष जावून योग्य ते कागदपत्रे दाखवून ते अप्रुव्हल करून घ्यावे. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-1 मधील पेंडिंग स्टेटसचे अप्रुव्हल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-2 सुरु होणार नाही. (राज्य मंडळाच्या निकालानंतर प्रवेश अर्जाचा भाग2 सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येतो.)

> या शैक्षणिक वर्षामध्ये द्विलक्षी विषयाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. (द्विलक्षी विषय म्हणजे Computer Science, Electronics, Banking, Office Management, etc. )

> ज्या विद्यार्थ्याना इ. 11 वीच्या वर्गात द्विलक्षी विषयात प्रवेश घ्यावयाचा आहेत अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागामध्ये Do you want to take admission in Bifocal subject? या ऑप्शनच्या समोर Yes ला क्लीक करावे. म्हणजे प्रवेश अर्जाच्या भाग2 मध्ये अशा विद्यार्थ्यांना द्विलक्षी विषयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम नोंदविता येतील व त्याचबरोबर त्यांनी निवडलेल्या सामान्य शाखेच्या (Arts, Science, Commerce) कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम नोंदविता येवू शकतात.
 
महत्त्वाच

> या शैक्षणिक वर्षापासून कला व सांस्कृतीक कोटा (2%) रद्द करण्यात आलेला आहे.

> इन-हाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोट्यामधून अकरावीच्या वर्गात प्रवेश घेवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनीसुद्धा अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

> प्रवेश घेवू इच्छिणार्‍या विद्यार्थी व पालकांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माहितीपुस्तीकेचे बारकाईने वाचन करावे.