Sat, Apr 20, 2019 08:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक; बरणी फुटली म्हणून मुलीचा अंगठा तोडला!

धक्कादायक; बरणी फुटली म्हणून मुलीचा अंगठा तोडला!

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:58AMमुंबई : प्रतिनिधी

खेळताना चायनीज दुकानात गेलेला फुगा नेण्यासाठी आलेल्या 11 वर्षीय मुलीचा धक्का लागून एक बरणी फुटली. याच रागातून दुकानदाराने भाजी कापण्याच्या चाकूने मुलीच्या हाताचा अंगठाच तोडल्याच्याची धक्कादायक घटना गोवंडीमध्ये मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी चायनीज दुकान मालकाचा शोध सुरू केला आहे. 

गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात 11 वर्षीय शिफा तुफेल अहमद शेख ही नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मैत्रिणींबरोबर फुग्यासोबत खेळत होती. ती खेळत असलेल्या ठिकाणीच एक चायनिजचे दुकान आहे. खेळता खेळता हातातील फुगा चायनिजच्या दुकानात गेल्याने तो आणण्यासाठी शिफा दुकानात गेली. फुगा घेताना धक्का लागल्याने तेथील मिठाची बरणी फुटली. रागाच्या भरात दुकान मालकाने हातातील भाजी कापण्याच्या चाकूने शिफावर हल्ला केला.

हल्ल्यात शिफाच्या हाताचा अंगठा तुटून ती बेशुद्ध झाली. हा प्रकार बघून खेळत असलेल्या मुलांनी आरडा-ओरड करण्यास सुरूवात केली. आपण पकडले जाऊ या भीतीने दुकान मालकाने तेथून पळ काढला. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देत, शिफाला तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. शिफाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन 25 वर्षीय चायनीज मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags : Mumbai, Mumbai news, 11 year old girl, thumb, cut, by knife,