Tue, Sep 17, 2019 22:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ११ वर्षांच्या यश वाघाची कॅन्सरशी झुंज 

११ वर्षांच्या यश वाघाची कॅन्सरशी झुंज 

Published On: May 23 2019 1:42AM | Last Updated: May 23 2019 1:44AM
ठाणे - प्रतिनिधी 

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 11 वर्षांचा असलेला यश नावाचा वाघ गेल्या 2 महिन्यांपासून जबड्याच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. गेल्या वर्षभरात यशच्या आजाराचे निदान व्हावे यासाठी मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने यशच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. पण त्याचे निदान होत नव्हते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथालॉजी विभागाच्या वतीने केलेल्या चाचण्यांच्या आधारे यशला जबड्याच्या कॅन्सरची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आजारामुळे यशच्या वागणुकीत गेल्या 2 दोन महिन्यात झपाट्याने बदल झाला आहे. तो आता पूर्वीसारखा मांसाहार करत नाही. गेल्या 2 महिन्यात त्याचे वजन 50 किलोने घटले आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह विहाराचे अधीक्षक संजय वाघमोडे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना दिली. 

मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथालॉजी विभागाच्या करण्यात आलेल्या चाचण्यांचे नमुने पुढील निदानासाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबतचे अहवाल आल्यानंतर त्याच्यावर आणखी चांगले उपचार केले जातील. यशच्या आजाराने सिंह विहाराचे आधिकारी आणि कर्मचारीही चिंतेत आहेत. पशुवैद्यक डॉ. वाकणकर, डॉ. पिंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी यशवर उपचार करत आहेत.