Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक, ३५ केंद्रावरील मतदान थांबवले

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक, ३५ केंद्रावरील मतदान थांबवले

Published On: May 28 2018 9:00AM | Last Updated: May 28 2018 10:37AMभंडाराः पुढारी ऑनलाईन

भंडारा-गोंदिया येथे सुरू असलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये इव्हीम मशीनमध्ये बिघाड झाल्याने ३५ मतदान केंद्रावरील मतदान थांबवण्यात आले आहे. या प्रकारामुळे गोंधळ उडाला आहे. भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात ११ मतदान मशीन बंद पडली आहेत. गोंदियामध्ये काही ठिकाणी मशीन बंद पडल्याची माहिती आहे. आयोगाच्या या भोंगळ कारभारामुळे मतदारांना मतदानासाठी ताटकळ रहावे लागले.

पालघरमध्येही चार ठिकाणी इव्हीम मशीन बंद पडले आहेत. या प्रकारामुळे निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. लोक सकाळी लवकर मतदान करण्यासाठी केंद्रावर येत असताना मशीन बंद पडल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मशीनपेक्षा चिठ्ठीने मतदान घ्या असे लोक मागणी करत आहेत.   

उत्तरप्रदेशमध्ये लोकसभेच्या एका जागेसाठी मतदान सुरू आहे. तेथेही चार ठिकाणी इव्हीम मशीन बंद पडल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.