Wed, May 27, 2020 01:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर जिल्ह्यात कोरोना बाधित ११ रुग्ण

पालघर जिल्ह्यात कोरोना बाधित ११ रुग्ण

Last Updated: Apr 02 2020 7:59PM

संग्रहित छायाचित्रपालघर : पुढारी वृत्तसेवा

पालघर जिल्हात कोरोना बाधित ११ रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये वसई -विरार महानगर पालिका क्षेत्रातील ९ तर पालघर तालुक्यातील २ कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. या पैकी एक रुग्ण ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. 

तसेच ४०६ परदेश प्रवाश केलेल्यांचा देखरेख कालावधी संपुष्टात आला आहे. विविध देशातून प्रवास करून आलेले प्रवासी, बाधित रुग्णाचे निकट सहवासातील लोकांना तीव्र श्वसन विकार असलेले ९९५ रुग्ण देखरेखीखाली ठेवण्यात आले असून ५९ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ७२ जणांचे घशातील नमुने तपासणीसाठी कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले असून त्यांचा तपासणी अहवाल अप्राप्त आहे. 

वरील ११ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७ पॉझिटिव्ह रुग्ण कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे दाखल करण्यात आले असून २ रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत. १ रुग्ण ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे दाखल करण्यात आला आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचा परदेश प्रवासाचा इतिहास नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.