Fri, Dec 13, 2019 00:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील दहा टक्के पाणी कपात मागे 

मुंबईतील दहा टक्के पाणी कपात मागे 

Published On: Jul 19 2019 5:12PM | Last Updated: Jul 19 2019 4:16PM
मुंबई  : प्रतिनिधी 

शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव 50 टक्के भरले आहेत. त्यामुळे पालिकेने नोव्हेंबर 2018 मध्ये लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात मागे घेतली आहे. तसे निवेदन शुक्रवारी स्थायी समितीत सादर करण्यात आले. 

मुंबईतील 10 टक्के पाणी कपात मागे घेण्याचे निर्देश गुरूवारी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिले. त्यामुळे शुक्रवारी तातडीने पाणी कपात मागे घेण्याची घोषणा केली. तलावात 7 लाख 30 हजार दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे.  तलाव भरण्यासाठी अजून 7 लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.

केवळ राज्यमंत्र्यांच्या आदेशानुसार घाईगडबडीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान हा निर्णय चुकीचा असल्याचे जलअभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्यांचे म्हणणे आहे. तलावातील पाणीसाठा किमान 10 लाख दशलक्ष लिटरपर्यंत पोहचणे आवश्यक होते. त्यानंतरच पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेणे संयुक्तिक ठरले असते, असेही काही वरिष्ठ अभियंत्यांनी सांगितले.