Tue, Mar 19, 2019 15:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुटुंबाला ठार मारण्यासाठी १० लाखांची सुपारी

कुटुंबाला ठार मारण्यासाठी १० लाखांची सुपारी

Published On: Apr 06 2018 2:13AM | Last Updated: Apr 06 2018 1:12AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याणमधील रहिवासी असलेल्या विनोद विशे यांना कुटुंबासह ठार मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी रामेश्वर पाटील व सुपारी घेणार्‍या सचिन पाचारकर (22) याच्या विरोधात गुन्हा दखल केला आहे.

कल्याण पश्चिमेकडे गौरीपाडा येथील रहिवासी विनोद विशे यांनी रामेश्वर पाटील व सचिन पाचारकर यांच्यापासून आपल्या तसेच कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याचा तक्रारी अर्ज खडकपाडा पोलिसांत दाखल केला होता. या अर्जाची चौकशी करण्यासाठी फौजदार नंदकुमार फडतरे व त्यांच्या पथकाने तक्रारदार विशे यांना बरोबर घेऊन पेट्रोलिंगच्या गाडीतून योगीधाम-गौरीपाडा परिसरात शोध सुरू केला. तपासादरम्यान गौरीपाडा येथील एका आईस्क्रीमच्या दुकानात दोघेजण आढळून आले. या दोघांची चौकशी केली असता रामेश्वर पाटील याने पाचारकर याला विनोद विशे याला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचे उघड झाले. या बदल्यात पाचारकर याला टिटवाळा येथे 10 लाख रुपयांची खोली देण्याचे आश्वासन पाटील याने टिटवाळा येथील आपल्या कार्यालयात दिल्याची कबुली दिली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम 120 (ब) कट-कारस्थान रचणे, 302 (खून), 115 सह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

tags : mumbai, mumbai news, 10 lakhs, kill, family,