होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Published On: May 30 2018 9:29PM | Last Updated: May 30 2018 9:29PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहापैकी काही अधिकाऱ्यां पदोन्नती देण्यात आली आहे. तर, काही अधिकाऱ्यांच्या फक्‍त बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपसचिव कैलाश गायकवाड यांनी राज्यपालांच्या आदेशानंतर पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली.

औरंगाबाद कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या यशस्वी जाधव यांना साईड पोस्टिंग देण्यात आले असून, त्‍यांची मुंबईच्या विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी व व्हीआयपी सुरक्षापदी बदली करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांची बदली 
यशस्वी जाधव (पदोन्नती), पोलिस उप महानिरीक्षक (सक्तीच्या रजेवर), बदलीचे ठिकाण : विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा, मुंबई

डॉ. सुहास मधुकर वापरके (पदोन्नती), पोलिस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई, बदलीचे ठिकाण : विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड

अश्वती दोर्जे (पदोन्नती), अपर पोलिस आयुक्त, सशस्त्र पोलिस मुख्यालय, नायगाव, मुंबई, बदलीचे ठिकाण : संचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक

डॉ. छेरिंग दोर्जे (पदोन्नती), अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई, बदलीचे ठिकाण : विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

के. एम. मल्लिकार्जून (पदोन्नती), अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, मुंबई, बदलीचे ठिकाण : विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर

रावसाहेब दत्तात्रय शिंदे (पदोन्नती), अपर पोलिस आयुक्त (संरक्षण व विशेष सुरक्षा), मुंबई, बदलीचे ठिकाण : संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे

व्ही. के. चौबे (बदली), विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, बदलीचे ठिकाण : सह पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई

आशुतोष डुंबरे (बदली), सह पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई, बदलीचे ठिकाण : सह पोलिस आयुक्त, गुन्हे, मुंबई

संतोष रस्तोगी (बदली), सह आयुक्त, गुप्तवार्ता विभाग, मुंबई, बदलीचे ठिकाण : सह पोलिस आयुक्त (प्रशासन), मुंबई

श्रीकांत के. तरवडे, पोलिस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, म. रा., पुणे, बदलीचे ठिकाण : पोलिस उप महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती