Tue, Jun 25, 2019 21:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नोकरानेच घातला 1 कोटी 11 लाखांचा गंडा

नोकरानेच घातला 1 कोटी 11 लाखांचा गंडा

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:50AMमुंबई : प्रतिनिधी

कंपनीच्या नावाचे लेटरहेड चोरी करुन त्याआधारे मालकाचा बँकेतील मोबाईल नंबर बदली करुन एका कर्मचार्‍याने कंपनीला 1 कोटी 11 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार काळबादेवीमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करुन लोकमान्य टिळक मार्ग या आरोपीचा शोध घेत आहेत. 

कांदिवली पुर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहात असलेल्या व्यापारी छगनराज पुरोहीत यांचा काळबादेवी रोडवरील दाभोळकर वाडीमध्ये कपड्यांचा व्यवसाय आहे. येथील कार्यालयात काम करत असलेल्या एका कर्मचार्‍याने कंपनीचे लेटरहेड चोरले. या लेटरहेडवर बँक खात्याला सलग्न असलेला पुरोहीत यांचा मोबाईल नंबर बदलण्याबाबत मजकूर लिहत, स्वतःचा मोबाईल नंबर टाकून पुरोहीत यांची बनावट स्वाक्षरी केली. त्यानंतर हे लेटरहेड त्याने बँकेत दिले. आणि याच आधारे कंपनीतील 2 लाख 37 हजार मीटर कापड परस्पर विकून 15 नोव्हेंबर 2016 ते 25 एप्रिल 2018 या काळात कंपनीला तब्बल 1 कोटी 8 लाखांना गंडा घातला.

पुरोहीत यांनी बँकेत भरण्यासाठी दिलेले साडेतीन लाख रुपये घेऊन हा कर्मचारी पसार झाल्यानंतर फसवणूकीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला. घरी नातेवाईकांकडेही शोध घेऊन तो न सापडल्याने अखेर पुरोहीत यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.