Sat, Apr 20, 2019 07:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात १.०९ कोटींच्या जुन्‍या नोटा जप्‍त

ठाण्यात १.०९ कोटींच्या जुन्‍या नोटा जप्‍त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

शहरातील कोरम मॉलसमोर १ कोटी ८ लाख ७० हजार किमतीच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यात ५०० व १००० च्या नोटा जप्‍त केल्या. 

वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक प्रदीप गिरिधर यांना चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटा घेऊन काहीजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. यावेळी त्याठिकाणी पाचजण हातात बॅगा घेऊन संशयितरित्या येत असल्याचे दिसले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे १ कोटी ८ लाख ७० हजार किमतीच्या जुन्या नोटा आढळल्या. 

पोलिसांनी जुन्या नोटो जप्‍त केल्या असून पाचजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.