होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आनंदवार्ता; म्हाडा लॉटरीत यावर्षी १,००० घरे

आनंदवार्ता; म्हाडा लॉटरीत यावर्षी १,००० घरे

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 2:17AMमुंबई : प्रतिनिधी 

म्हाडाच्या घरांची लॉटरी यंदा उशिरा होण्याची शक्यता असली तरी या लॉटरीत तब्बल 1 हजार घरे असतील आणि त्यातही दुर्बल व मध्यम गटांसाठी तुलनेने जास्त घरे असण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी म्हाडाच्या घरांची संख्या 819 इतकीच होती त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकही घर नव्हते. परिणामी म्हाडावर टीका झाली होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 400, तर मध्यम उत्पन्न गटासाठी सुमारे 200 घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दुर्बल घटकांसाठी मानखुर्दमध्ये 100 तर, अ‍ॅन्टॉप हिलमध्ये 300 घरे राखून ठेवण्यात येणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणतः मे महिन्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी काढली जाते. मागच्या वर्षी  ती थेट नोव्हेंबरमध्ये काढली होती. यंदाही उशिरा लॉटरीचा हा सिलसिला कायम राहण्याची शक्यता आहे. त्याला अर्थात म्हाडा जबाबदार नाही. म्हाडाचे सर्व अधिकारी विधिमंडळ अधिवेशनात व्यग्र असल्याने लॉटरीबाबत कुठलीही बैठक होऊ शकली नाही. शिवाय येणार्‍या लॉटरी घराच्या किंमती किती ठेवायच्या हेदेखील निश्‍चित होऊ शकले नाही. रेडीरेकनर आणि जीएसटीनुसार हे दर जाहीर होतील.

Tags : mumbai, MHADA lottery, this year, 1,000 houses, mumbai news,