Mon, Aug 26, 2019 15:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : ताज हॉटेलजवळ इमारतीला आग; एक ठार

मुंबई : ताज हॉटेलजवळ इमारतीला आग; एक ठार

Published On: Jul 21 2019 1:49PM | Last Updated: Jul 21 2019 3:53PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

ताज  हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या चर्चिल चेंबर इमारतीला आग लागली होती. या इमारतीतून 10 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

परंतु, ही आग कशामुळे लागली अद्याप समजले नाही. अग्निशमन दलाचे जवान अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. रुग्णांना जिटी, सेंजॉर्ज, बॉम्बे हॉस्पिटल मध्ये अडमिट करण्यात आले आहे. श्याम अय्यर(54) यांचा या आगीत मृत्यू झाला असून , बॉम्बे रुग्णालयात असलेल्या युसूफ पुनावाला (50) गंभीर आहेत.