Tue, Jan 21, 2020 10:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत तीन कारगाड्या एकमेकांना धडकल्या; ८ जखमी 

तीन कारगाड्या एकमेकांना धडकल्या; ८ जखमी 

Published On: Jul 24 2019 8:15AM | Last Updated: Jul 24 2019 8:16AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई आणि उपनगरांत रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकून वाहतूक खोळंबली आहे. याच दरम्यान पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मुंबईतील सायन येथे विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन कारगाड्या एकमेकांना धडकल्या. यात अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आज, बुधवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा येथे १७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे ५८ मिलिमीटर पाऊस झाला.