Fri, Apr 26, 2019 03:54होमपेज › Marathwada › बीड : वरातीत नाचताना तरुणाचा मृत्यू

बीड : वरातीत नाचताना तरुणाचा मृत्यू

Published On: Jun 18 2018 11:51PM | Last Updated: Jun 18 2018 11:50PMवडवणी : प्रतिनिधी

जिवलग मिञाच्या लग्नाचा  आनंद साजरा करण्यासाठी तब्येतीकडे दुर्लक्ष करून तो लग्नाच्या वरातीत सहभागी झाला. माञ नाचताना चक्कर येऊन पडला तो पुन्हा उठलाच नाही. अगदी तरूण वयात दोन लेकरांचा बाप असणार्‍या बालाजी बंधारे या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने वडवणीवर शोककळा पसरली आहे.

वडवणी येथील  बालाजी पंधारे हा तीस वर्षीय तरुण आपल्या भावासह येथील चिंचवण रस्त्यावर हॉटेल व्यावसाय करत होता. त्याच्या मिञाचे सोमवारी दुपारी येथील एका मंगलकार्यालयात लग्न होते. जिवलग मिञाचे लग्न असल्याने तो आनंदी होता. मिञाच्या लग्नात जल्लोष साजरा करण्यासाठी लग्नाच्या पारण्याच्या वरातीत तो नाचू लागला. नाचतानाच त्याला चक्कर आली. तो खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

त्याच्या अचानक मृत्यूमुळे वडवणीत लग्न समारंभावर शोककळा पसरली. वडवणी शहरात माहिती होताच व्यापारयांनी धाव घेतली. अत्यंत होतकरू आणि मनमोकळ्या स्वभावाचा बालाजी पंधारे या  तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

वडीलांचे गेल्या वर्षीच हृदयविकाराने निधन

बालाजी पंधारे याचे वडील दत्तात्रय पंधारे यांचे गेल्या वर्षीच हृदयविकाराने मृत्यू झाला होता. बालाजीचा मृत्यूही हृदयविकारानेच झाला असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बालाजीच्या तीन चिमुकल्यांचे पितृछत्र हरवले आहे. तर पत्नी, आईसह भावांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.