Wed, Jun 03, 2020 17:02होमपेज › Marathwada › फेसबुकवर अवमानकारक मजकूर टाकणार्‍या ‘त्या’ तरुणास अटक

फेसबुकवर अवमानकारक मजकूर टाकणार्‍या ‘त्या’ तरुणास अटक

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 12 2018 9:46PM

बुकमार्क करा
लातूर ः प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फेसबुकवर अवमानकारक मजकूर टाकणार्‍या नांदुर्गा येथील बाळेश्‍वर कांबळे या युवकास गुरुवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. त्या आक्षेपार्ह  पोस्टबद्दल सविस्तर माहिती  मिळवण्यासाठी अमेरिकेतील फेसबुक मुख्यालयाला पोलिसांनी ई-मेल केला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी दिली.

बाळेश्‍वर कांबळे याने टाकलेली पोस्ट बुधवारी उघडकीस आल्यानंतर नांदुर्गा गावात तणाव निर्माण झाला होता. त्याची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी गावकर्‍यांची बैठक घेऊन आरोपीस बारा तासांत अटक करण्याचे आश्‍वासन दिले होते. बाळेश्‍वर हा भिवंडी येथील एका मेणबत्तीच्या कारखान्यात कामास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. गुरुवारी पहाटे तो आला असता त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, या पोस्टच्या निषेधार्थ किल्लारी येथे गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.