Thu, Feb 21, 2019 05:03होमपेज › Marathwada › लातुरात मराठा क्रांती मोर्चातील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

...तर मी का जगू?; आणखी एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jul 24 2018 12:46PM | Last Updated: Jul 24 2018 1:02PMलातूर : प्रतिनिधी 

लातूर येथे मराठा क्रांती मोर्चातील एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. अमोल जगताप (वय, २५) असे आत्‍मदहन करणाऱ्या युवकाचे नाव असून, तो रेणापूर तालुक्यातील वाला गावचा रहिवाशी आहे.  

वाचा : LIVE : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातुरातील तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असून, त्यामुळेच माझ्या भावाने आत्महत्या केली आहे. मी तरी कशाला जिवंत राहू? म्हणत अमोलने स्वतः जवळची पेट्रोलची बाटली अंगावर ओतली. यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलिस जमादार शिवाजी केंद्रे यांनी ती हिसकावून घेतली. अमोलच्या डोळ्यात पेट्रोल गेल्याने उपचारार्थ त्याला शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

वाचा : ...तर काकासाहेबचे प्राण वाचले असते !