Wed, May 27, 2020 00:08होमपेज › Marathwada › विजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू

Published On: Jul 11 2019 10:22PM | Last Updated: Jul 11 2019 10:22PM
गेवराई : प्रतिनिधी 

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एका ३० वर्षीय हॉटेल चालक तरुणाचा बोअरची विद्युत मोटार सुरु करताना विद्युत प्रवाह स्टाटरमध्ये उतरल्यानंतर विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. शरद रख्माजी शिंगणे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी उशीरापर्यंत तलवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली नव्हती. 

गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या हॉटेलच्या पाठीमागील शेतातील बोअरची विद्युत मोटार सुरु करण्यासाठी शरद गेला असता अचानक स्टाटरमध्ये करंट उतरल्यामुळे त्याला विजेचा धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून घटनास्थळी पंचनामा करुन तलवाडा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.