Tue, May 21, 2019 04:15होमपेज › Marathwada › कर्जबाजारीपणामुळे परभणीमध्ये युवा शेतकर्‍याची आत्‍महत्या

परभणी: कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍याची आत्‍महत्या

Published On: Feb 22 2018 12:55PM | Last Updated: Feb 22 2018 9:30PMपरभणी : प्रतिनिधी

परभणीत कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याच्या मुलाने आत्‍महत्या केली. विठ्ठल घुले (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांकडे विजया बँकेचे कर्ज होते.

विठ्ठल हा जिल्‍ह्यातील किनोळी येथील रहिवासी होता. शेतकर्‍याच्या मुलाच्या या आत्‍महत्या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.