Sat, Feb 16, 2019 05:05होमपेज › Marathwada › चुकीचे वीजबिल दिल्यामुळे शेतकर्‍याने केले विषप्राशन 

चुकीचे वीजबिल दिल्यामुळे शेतकर्‍याने केले विषप्राशन 

Published On: Jan 21 2018 2:48AM | Last Updated: Jan 20 2018 8:28PMलातूर : प्रतिनिधी

औसा तालुक्यातील शेतकरी शहाजी राठोड यांना न वापरलेल्या विजेचे बिल देऊन बिल भरले नाही म्हणून विद्युत कनेक्शन तोडण्यात आले. बिलाची दुरूस्ती करून वीज कनेक्शन जोडण्यासाठी विद्युत कार्यालयात जाऊन अनेकदा मागणी केल्याची व मागणी करूनही कनेक्शन जोडले नाही. म्हणून विद्युत कार्यालयात राठोड यांनी विष प्राशन केल्याची माहिती राठोड यांच्या नातेवाईकाने दिली. आशीर्वाद हॉस्पिटल, लातूर येथे जाऊन राठोड यांच्या प्रकृतीची चौकशी माजी आ. शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी केली. त्यावेळी वरील माहिती कव्हेकर यांना देण्यात आली. कव्हेकर यांनी राठोड यांची भेट घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी त्यांच्यासमवेत एम. एन. एस. बँकेचे व्हा.चेअरमन एस.आर.मोरे, जननायक संघटनेचे रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे आदी उपस्थित होते.

शेतीमालाला भाव नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी त्यातच होत असलेला विजेचा लपंडाव शेतीच्या उत्पन्‍नावर परिणाम होत असल्याने शेतकरी विवंचनेत सापडत आहेे. अशा शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी माजी आ. कव्हेकर प्रयत्न करीत आहेत.