Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Marathwada › आणखी एका पैलवानाचा अपघाती मृत्यू

आणखी एका पैलवानाचा अपघाती मृत्यू

Published On: Jan 23 2018 7:30PM | Last Updated: Jan 23 2018 7:30PMऔंढा नागनाथः प्रतिनिधी

औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथील मल्‍ल हिंगोली येथे कुस्त्या खेळून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास (दि.२२) पेरजाबादकडे परत येत असताना सुरेगाव पिंप्री फाट्यावरील पुलाजवळ दुचाकीच्या अपघातात ठार झाला. त्याच्या सोबतचा एकजण जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सहदेव तुकाराम आव्हाड (वय १८) रा.पेरजाबाद व मित्र वामन गंगाराम जुमडे हे दुचाकीवरून हिंगोली येथील कुस्त्यांचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परत येत  असताना हा अपघात झाला.

सुरेगावच्या पुलावर अज्ञात वाहनाचे चाक सहदेव आव्हाड याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद अद्याप औंढा पोलिस ठाण्यात झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी सांगितले. सांगलीतील ६ पैलवानांनच्या अपघाताची घटना ताजी असतानाच तरूण पैलवानाच्या अशा अपघाती जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.