Tue, Mar 19, 2019 05:12होमपेज › Marathwada › मुख्याधिकार्‍यांस शिवीगाळ, कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

मुख्याधिकार्‍यांस शिवीगाळ, कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:44PMहिंगोली : प्रतिनिधी

सेनगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना सोमवारी (दि.11) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नगरसेविकेच्या नातलगाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मारहाणीची धमकी दिली. या घटनेचा राज्य न.प.कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पदाधिकार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांना दिले.

या प्रकरणातील सेनगाव नगर पंचायतील नगरसेविका यांचे नातेवाईक बबन सुतार यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंद करून कडक कारवाई करावी. जेणेकरून नगर परिषद/नगर पंचायत मुख्याधिकार्‍यांना कामकाज करता येईल. अशा प्रकारे मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे आदी बाबींवर आळा बसेल. तसेच कोणत्याही नगरसेवक /नगरसेविकांचे नातेवाईक हे नगर परिषद/ नगर पंचायत कामकाजात हस्तक्षेप करणार नाहीत, याबाबत कठोर कायदा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन राज्य न.प.कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून कामबंद आंदोलन केले. तर सेनगाव नगर पंचायत कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. यावेळी पदाधिकार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांना दिले. निवेदनावर गजानन बांगर, रघुनाथ बांगर, जगन्‍नाथ दिनकर, विनायक पडोळे, कैलास बीडकर, विशाल जारे, आकाश देशमुख, ए.बी.कपाटे, नामदेव हरण, परसराम कोकाटे, शे.फकिर, केशव वाघ, कांता गाढवे, विनायक गाडेकर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.