Sun, Jul 21, 2019 13:06होमपेज › Marathwada › लाच घेताना महिला वकिलास रंगेहात पकडले 

लाच घेताना महिला वकिलास रंगेहात पकडले 

Published On: Dec 07 2018 7:57PM | Last Updated: Dec 07 2018 7:57PM
लातूर : प्रतिनिधी

खटल्याची तारीख वाढवून देण्याच्या कामात मदत करण्यासाठी अडीच हजारांची लाच घेणाऱ्या सहाय्यक महिला सरकारी वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शुक्रवारी दुपारी  ही कारवाई करण्यात आली. ॲड. अनुराधा शिवाजीराव झांपले (वय, ४७) असे आरोपीचे नाव असून, त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

तक्रारदारास एका खटल्‍याची तारीख वाढवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने एसीबीला कळवले होते. त्यानुसार लातूरच्या न्यायालय परिसरात एसीबीने सापळा लावला होता. पोलिस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पथकात पोलिस उपाधीक्षक मानिक बेद्रे, पोलिस निरीक्षक वर्षा  दंडीमे, कुमार दराडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.