Wed, Sep 26, 2018 20:00होमपेज › Marathwada › महिलेचा पाण्यात  आढळला मृतदेह 

महिलेचा पाण्यात आढळला मृतदेह 

Published On: Feb 23 2018 1:41AM | Last Updated: Feb 23 2018 1:40AMमाजलगाव : प्रतिनिधी

टाकरवण येथील माध्यमिक विद्यालयातील शिपाई दत्ता गायकवाड यांची पत्नी संगीता दोन दिवसांपूर्वी बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह गावाजवळील कॅनॉलमध्ये पाण्यात आढळला. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा नातेवाइकांच्या संशय आहे. प्रेत तपासणीसाठी आंबाजोगाईच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील दत्ता धर्मराज गायकवाड यांची पत्नी संगीता हिचे पतीसोबत भांडण झाले होते. संगीता दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची माहिती पती दत्ता गायकवाड यांने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. गुरुवारी (दि.22) सकाळी 8 च्या सुमारास  टाकरवण गावाजवळून गेलेल्या पैठणच्या उजव्या कालव्यात महिलेचे प्रेत तरंगत असल्याचे काहींना दिसले. ही माहिती कोतवाल आडागळे यांनी माजलगाव ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर या ठिकाणी सहायक पोलिस निरिक्षक बी. ए. कदम यांनी फौजदार एस. जी. नरके यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांना सोबत घेऊन घटनास्थळावर दाखल झाले.मृतदेह टाकरवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छदनासाठी आणण्यात आले. मात्र हा प्रकार  घातपाताचा असल्याचा नातेवाइकांचा संशय व्यक्त केला. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. झेंडे यांनी या ठिकाणी अशा प्रेतावर शवविच्छेदन करण्याची व्यवस्था नसल्याचे सांगितले. मृतदेह तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला.

संगीता दत्ता गायकवाड हिने आत्महात्या केली नसून तिचा खून करण्यात आल्याची फिर्याद  संगीता यांची आई सुंदराबाई अभिमान कदम (रा.चाटगाव ता.धारूर) यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. फर्यादीनुसार अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.