होमपेज › Marathwada › 5 मिनिटांत 25 लाखांचा निधी

5 मिनिटांत 25 लाखांचा निधी

Published On: Apr 21 2018 1:02AM | Last Updated: Apr 20 2018 11:15PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकर्‍यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी  केल्यानंतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दातृत्वाची भूमिका घेत मदतीचा हात दिला. केवळ पाच मिनिटांत 25 लाख रुपये दुष्काळी कामासाठी जमा झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामस्थांनी डिझेलसाठी 60 हजार रुपये जमविल्यास स्थानिक जैन संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने 20 हजार रुपये प्रत्येक गावासाठी देण्याचा निर्धारही जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यातील  बीड जिल्ह्यातील केज, धारूर, अंबेजोगाई, परळी या  तालुक्यांमधील तहसीलदार, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, बीजेएसचे कार्यकर्ते आणि तालुका प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक अभियांत्रिकी महाविद्यालच्या सभागृहात  दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित  करण्यात आली होती. या सभेत आमदार प्रा. ठोंबरे बोलत होत्या.

श्रमदानाचा टप्पा पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत जेसीबी/पोकलेन पुरवून दुष्काळ मुक्तीच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे.  वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधील ग्रामस्थांचा श्रमदानाचा वेग कसा वाढू शकेल, शासनाच्या निर्णयाप्रमाणे श्रमदान करणार्‍या गावांना डिझेल पुरविण्याची प्रक्रिया सोपी कशी होईल, तोपर्यंत ग्रामस्थ लोकवर्गणीतून डिझेल भरण्याची व्यवस्था कशी करतील या ती मुख्य मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

या वेळी आमदार प्रा. संगीता ठोंबरे, माजी नगराध्यक्ष  राजकिशोर मोदी, शिवकुमार स्वामी, डॉ. आय. बी. खडकभावी, तहसीलदार शरद झाडके,  अक्षय मुंदडा, उपसभापती  तानाजी देशमुख,  विजय वाकेकर, विजयराज बंब, संतोष कुंकुलोळ, नगरसेवक  मिलिंद बाबजे, गटविकास अधिकारी  दत्ता गिरी, किशोर बंब, संतोष सिंगारे, प्रसाद चिक्षे आदी आदींसह अंबाजोगाईसह जिल्हाभरातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.