Sun, May 26, 2019 13:39होमपेज › Marathwada › बीड : रागाच्या भरात पत्नीचा खून; परळी तालुक्यातील घटना

बीड : रागाच्या भरात पत्नीचा खून; परळी तालुक्यातील घटना

Published On: Jul 04 2018 3:04PM | Last Updated: Jul 04 2018 3:04PMपरळी : प्रतिनिधी

घरगुती भांडण टोकाला जाऊन रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना परळी तालुक्यातील कौठाळी तांड्यावर मंगळवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

सुनिता दिलीप चव्हाण (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे. सुनिता आणि दिलीपच्या लग्नाला चार वर्षे झाली असून त्यांना अडीच आणि दीड वर्षाच्या दोन मुली आहेत. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यात वाद झाला. वाद टोकाला गेल्याने दिलीपने रागाच्या भरात सुनीताचा गळा दाबला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सुरुवातीस पत्नी बेशुद्ध पडली असावी म्हणून दिलीपने तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून सुनीताला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दिलीपला ताब्यात घेतले असून कायदेशीर कार्यवाही सुरु आहे. नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर त्याआधारे गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे सांगितले.

शवविच्छेदन करण्यावरून दोन रुग्णालयात टोलवाटोलवी

दरम्यान, नागापूर आणि परळी उपजिल्हा रुग्णालयात हद्दीचे कारण पुढे करून सुनीताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास टोलवाटोलवी करण्यात येत होती. अखेर वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर परळीच्या रुग्णालयातच शवविच्छेदन करण्याचे निश्चित झाल्याचे समजते. शासकीय रुग्णालयांच्या आडमुठ्या भूमिकेबद्दल ग्रामस्थातून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या.