Wed, Apr 24, 2019 01:30होमपेज › Marathwada › लातूरमधील किल्लारीत पत्नीचा खून, पती  पोलिसात हजर

लातूरमधील किल्लारीत पत्नीचा खून, पती  पोलिसात हजर

Published On: Dec 07 2017 5:53PM | Last Updated: Dec 07 2017 5:53PM

बुकमार्क करा

लातूर: प्रतिनिधी

किल्लारी (जि. लातूर) येथील एकाने गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो स्वतः हून किल्लारी पोलिसात हजर झाला. किरण शाहूराज बिराजदार (वय २७) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, किरण हा तुळजापूर तालुक्यातील बाबळगावचा रहिवासी असून किल्लारी येथील सुशिलादेवी पतसंस्थेत नोकरी करतो, तसेच तो यळवट पाटी येथील  वाडीकर धाबाही चालवतो. मागील दोन वर्षापूर्वी मूरटा (ता. तुळजापूर) येथील अशोक सुरवसे यांची मुलगी अश्विनीशी त्याचा विवाह झाला होता. गुरुवारी दूपारी बारा वाजता किरण याने किल्लारी येथील भाड्याने राहत असलेल्या घरी पत्नीचा गळा दाबून खून केला. यानंतर तो पोलिसात दाखल झाला. खूनाचे कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत पोलिस तपास करीत आहेत. 

अश्विनी यांचे प्रेत सध्या किल्लारी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आले आहे. मृत अश्विनीचे आई-वडील सध्या उरुळी कांचन सरतापवाडी पूणे येथे असून ते उशिरा किल्लारीत पोहचणार आहेत. आई वडील आल्यानंतर गुन्‍हा नोंद दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.