Sat, Nov 17, 2018 19:32होमपेज › Marathwada › बीडमधील तांबवामध्ये पत्‍नीचा खून करून पतीची आत्‍महत्‍या

बीडमधील तांबवामध्ये पत्‍नीचा खून करून पतीची आत्‍महत्‍या

Published On: Mar 23 2018 10:33AM | Last Updated: Mar 23 2018 10:31AMकेज : दीपक नाईकवाडे

तालुक्यातील तांबवा येथे अंगणवाडी कार्यकर्ती असलेल्या पत्नीचा खून करून पतीने बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी केज पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

केज तालुक्यातील तांबवा येथील ललिता चाटे यांच्या सोबत नागझरी येथील सुंदर बळीराम मुंडे यांचा विवाह झाला होता. पत्नीस अंगणवाडीची नोकरी असल्याने सुंदर मुंडे गेल्या अनेक वर्षापासून तांबवा येथे वास्तव्यास होते. तांबवा येथे सुंदर मुंडे यांनी जमिन घेऊन ते शेती करत असत. सुंदर मुंडे व ललिता मुंडे यांना दोन मुले व एक मूलगी  आहे. मुलीचा विवाह झाला आहे तर एक मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे. तर एक औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. त्यामुळे घरात पती पत्नी दोघेच राहत होते.

ललिता मुंडे व पती सुंदर मुंडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडणे होत होती. गुरुवारी रात्री सुंदरने पत्नी ललिता यांचा राहत्या घरात गळा दाबून खून केला. यानंतर सुंदर याने झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताचा भाऊ रंगनाथ  मुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.