Sat, Nov 17, 2018 05:46होमपेज › Marathwada › पत्नीने अखेरचा श्वास घेतल्याचे कळताच पतीची आत्महत्या 

पत्नीने अखेरचा श्वास घेतल्याचे कळताच पतीची आत्महत्या 

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 11:13PMआष्टी : प्रतिनिधी

दवाखान्यात उपचार घेत असताना पत्नीने अखेरचा श्वास घेतला, ही माहिती कळताच पतीला धक्का बसला. या धक्कयात त्यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पती-पत्नीवर एकाच चितेवर अत्यंविधी करण्यात आला.

आष्टी तालुक्यात असलेली दुष्काळी परस्थिती आणि नापिकी याला कंटाळून अनेक कुटुंब कामाच्या शोधात पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले आहेत. याच परिस्थितीत ब्रम्हगाव येथील नारायण जोतिराम पवार यांचे कुटुंब बारामती जवळील सनसर परिसरातील एका बागयतदाराकडे मोलमजुरीला गेले होते. नारायण पवार यांचे वडील जोतिराम पवार ( वय 65)  व आई द्वारकाबाई जोतिराम पवार (वय 60) हे ब्रम्हगाव येथे राहून शेती पहात होते. पंधरा दिवसांपूर्वी द्वारकाबाई या आजारी पडल्याने त्यांचा मुलगा नारायण यांनी त्यांना बारामती येथे उपचारासाठी नेले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने लोणंद (जि. पुणे) येथील दवाखान्यात दाखल केले. गुरुवारी  मध्यरात्री द्वारकाबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. ही माहिती त्यांचे पती जोतिराम यांना शुक्रवारी सकाळी कळताच त्यांना धक्का बसला. या धक्कयातून ते बाहेर आलेच नाहीत. त्यांनी सकाळी 8:30 वा. च्या सुमार आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपली. शुक्रवारी दुपारी 2:30 वा.च्या सुमारास ब्रम्हगाव येथे एकाच चितेवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.