Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Marathwada › तुम्हीच सांगा विवाह दवाखान्यासाठी पैसे आणायचे कोठून ?

तुम्हीच सांगा विवाह दवाखान्यासाठी पैसे आणायचे कोठून ?

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:13PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

गेल्या पंधरा दिवसांपासून राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका कॅशलेस झाल्या आहेत. पैशाची मोठ्या स्वरूपात टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल, मे महिन्यात विवाहाच्या तारखा अधिक असल्याने, लग्न समारंभासाठी पैसे बँक खात्यावर जमा असताही मिळत नाही. त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. एटीएममध्ये खडखडाट आहे असून, नागरिकांना विवाह तसेच दवाखान्यासारख्या खर्चासाठी अडचण ठरत आहे. 

बँकेत आवश्यक पैसा उपलब्ध नसल्याने, खातेदार नेहमीप्रमाणे एटीएममध्ये जात असले तरी हिरमुसल्या चेहर्‍याने परतत आहेत. थेट बँकेत गेल्यानंतरही सेव्हिंग खातेदारास पाच हजार तर करंट खातेदारास दहा ते वीस हजारापर्यंत रक्कम दिली जात आहे. पैशाच्या कारणावरून ग्राहकात व बँक कर्मचार्‍यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. पैसे टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकरी व व्यापारर्‍यांना बसत आहे. आडत दुकानदार धान्य खरेदी करून एकू ण  रकमेचा चेक देत आहेत. शेतकरी सदरील चेक बँकेत घेऊन, गेल्यास नगदी रक्कम न देता खात्यावर वर्ग केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या नोटाबंदीची आठवण होत आहे.  

बँकेत शेतकर्‍यांना चेकवर असलेली रक्कम मिळत नसल्या कारणाने शेतकरी आडत दुकानदारास नगदी पैशाची मागणी करत आहेत, परंतु नगदी पैसे देण्यासाठी आडत दुकानदाराकडेही पैसे नाहीत असे, आडत दुकानदार प्रवीण दामा यांनी सांगितले. विवाह कार्य तसेच दवाखाना खर्च अशा अत्यावश्यक कारणांसाठी वाढीव रक्कम देतो आहोत. आणखी काही दिवस पैशाची टंचाई राहू शकते असे स्टेट बँक ऑफ हैदराबादचे शाखाधिकारी बिरेश्‍वर सिंह म्हणाले.

Tags : Marathwada,  where, bring, money, marriage, hospital