Tue, Jul 07, 2020 20:44होमपेज › Marathwada › जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धेस सुरुवात

जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धेस सुरुवात

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:05AMबीड : प्रतिनिधी 

पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेस रविवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील 78 गावे स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. मध्यरात्री 12 वाजता अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत तरुणांचा उस्त्फू र्त सहभाग दिसून येत आहे. स्पर्धेत सहभागी असणार्‍या जिल्ह्यातील 78 गावात रात्रीपासूच हातात खोरे, टिकाव आणि टोपलं घेत काम सुरू केले. हातात मशाली घेऊन पुढे आलेले तरुण आणि ग्रामस्थ अर्ध्या रात्री ठिकठिकाणी पहावयास मिळाले.

मध्यरात्री 78 गावांमध्ये तर रविवारी सकाळी 122 गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. अन्य गावांमध्येही ही स्पर्धा राबविण्यात येत असून तिथेही कामे सुरू झाली आहेत. चित्रपट अभिनेते अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा 45 दिवस सुरू राहणार असून त्यानंतर गावातील कामांचे मूल्यमापन करून संबंधित गावांना लाखोंचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 413 गावांचा वाटरकप स्पर्धेत समावेश झाला आहे. गतवर्षी दुसरे आणि तिसरे पारितोषिक पटकावणार्‍या गावांत यावर्षी मोठा उत्साह पहायला मिळत आहे. 8 एप्रिल ते 22 मे या दरम्यान होत असलेल्या स्पर्धेचा नारळ मध्यरात्री विविध गावांमध्ये फुटला. अंबाजोगाई तालुक्यातील 5, केज 7, आष्टी 25, परळी 20, धारूर 21 अशा एकूण 78 गावांमध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. तरुणांसह महिला, पुरुष हातात खोरे, टिकाव आणि टोपले घेऊन अंधार्‍या रात्री प्रत्यक्ष कामावर आले होते. 

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत पाच तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमधील 78 गावांमध्ये मध्यरात्री ग्रामस्थांनी कामे सुरू केली आहे. या स्पर्धेत तरुणांचा उत्स्फू र्त सहभाग दिसून येत आहे.
-एम.डी. सिंह, जिल्हाधिकारी, बीड. 

पठाण मांडवा येथे शुभारंभ

अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथे सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेचा शुभारंभ माजी आ. पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

Tags : watercup, competition, beed news