Sat, Aug 24, 2019 23:14होमपेज › Marathwada › गोदाकाठ तहानलेला

गोदाकाठ तहानलेला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गंगाखेड : प्रतिनिधी

उन्हाळा सुरू होताच तालुक्यासह शहरास पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शहरास पाणीपुरवठा करणार्‍या मासोळी प्रकल्पात 12% पाणी शिल्लक असून दहा दिवसांआड शहरास दीड तास पाणीपुरवठा नगर परिषद करीत असल्याने पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना बसत आहेत.

तालुक्यात 277 गावांसह 71 वाडी तांड्यांना पाणीटंचाईची झळ बसू नये याकरिता पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना केल्या आहेत. दक्षिणगंगा असलेल्या गोदावरी नदीवर शासनाने मुळी येथे बंधारा उभारल्याने हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येऊन हरितक्रांती तालुक्यात निर्माण होऊन शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. पण शासनाने या बंधार्‍यास  दरवाजे बसविण्याचा प्रयोग केला तो पूर्णपणे फसला. बंधार्‍याचे 19 पैकी 16 दरवाजे पुराच्या पाण्यात तुटले. यामुळे दरवर्षी या बंधार्‍यात पावसाचे पाणी आडत नसल्याने गोदाकाठ नेहमीत तहानलेला राहत आहे. याच बंधार्‍यामुळे शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार होता. पण बंधारा उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था शहरवासीयांची झाली आहे.

माजी आ. सीताराम घनदाट यांनी शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मासोळी प्रकल्पातून पाणी पुरवण्याची योजना कार्यान्वित केल्याने शहराची तहान भागत आहे. याच मासोळी प्रकल्पात सद्यःस्थितीत 12% पाणी शिल्लक असून पुढील दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. नगर परिषद या पाण्याचे नियोजन करून शहरास दहा दिवसाआड दीड तास पाणीपुरवठा करीत आहे. जुन्या गंगाखेड शहरास आजही गोदावरीतून पाणीपुरवठा केला जात आहे. गोदावरी पात्रात वरील भागातील पाण्याचा दांड काढून विहिरीत सोडण्यात आलेला असल्याने या भागात नागरिकांना  पाणीटंचाईचा जबर फटका बसत आहे. तालुक्यातील कातकरवाडी, खादगाव, तांदळवाडी, बडवणी, ढेबेवाडीतील एक व अंतरवेली येथील दोन असे सात साठवण तलाव कोरडे पडले आहेत.

पंचायत समितीने तालुक्यातील 277 गावासह 71 वाड्या तांडे यांना पाणीटंचाईची झळ बसणार असल्याने नियोजन केले आहे. 81 गावांसह 14 वाडीतांडे येथे नवीन विंधन विहीर घेणे, 86 गावांसह 40 वाडीतांडे येथील विहीर, बोअरचे अधिग्रहण करणे. 22 गावात नळयोजना दुरूस्त करणे, 58 गावांतील विंधन विहीरी, विद्युतपंप दुरुस्त करणे तर 25 गावांसह 17 वाडीतांडे येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

Tags : Parbhani news,water scarcity, godakath,


  •