Tue, Jul 16, 2019 09:58होमपेज › Marathwada › पशू-पक्ष्यांसाठी बांधले पाण्याचे हौद

पशू-पक्ष्यांसाठी बांधले पाण्याचे हौद

Published On: Mar 22 2018 1:42AM | Last Updated: Mar 22 2018 12:05AMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

पशू-पक्ष्यांची पाण्याची सोय करण्यासाठी पाच वॉटरहोल आणि पाण्याचे हौद बांधून पशू-पक्ष्यांची चांगलीच सोय केली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अंबाजोगाई परिसरात उन्हाच्या तीव्र झळा निर्माण होवू लागल्या आहेत. यावर्षी बर्‍यापैकी पाऊस झाला असला तरी   मुकुंदराज-बुट्टेनाथाचा गर्द हिरव्या झाडांनी नटलेला परिसर आता रुक्ष दिसू लागला आहे. पावसाच्या पाण्याने निर्माण झालेला ओलावा संपुष्टात येऊ लागल्यामुळे पाण्याने भरलेले डबके आता कोरडे पडू लागले आहेत. 

पशू-पक्ष्यांची पाण्यासाठी प्रचंड तारंबळ होत आहे. पक्षी मित्रांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी पशू-पक्ष्यांची पाण्याची सोय करण्यासाठी पाच वॉटरहोल आणि पाण्याचे हौद बांधून पशू-पक्ष्यांची चांगलीच सोय केली आहे. यासर्व पक्षी मित्रांच्या वतीने गेल्या आठवड्यात इथे पाच पाणी साठवण्याचे कायमस्वरूपी हौद बनवून घेतले आहेत. या वॉटरहोलमध्ये सर्व सगळे पक्षी आपली तहान भागवू शकतात 200 फूट लांबीचा पाण्यासाठीचा पीव्हीसी पाईप विकत घेऊन या वॉटरहोलची निर्मिती केली आहे. 

याशिवाय पशुंना पाणी पिण्यासाठी जमिनीवर सिमेंट काँक्रीटचे पाण्याचे हौद ही निर्माण करण्यात आले आहेत. या वॉटरहोल आणि पाण्याचा हौदामध्ये सध्या रोजच्यारोज पाणी टाकण्याचा प्रयत्न ही या पक्षीमित्रांकडून करण्यात येतो आहे. 

येत्या काहीदिवसांत येथे पाण्याची टंचाई नक्कीच भासणार असून आम्हाला पाण्याचा टँकर विकत घेऊन तिथे पाणी टाकावे लागेल. पावसाळ्या नजीकच्या काळात पक्षीमित्रांच्यावतीने याठिकाणी पाच-सहा फूट उंचीची मोठी असलेली किमान 50-100 रोपे टप्प्या टप्प्याने लावायचं नियोजन करण्यात आले असल्याचेही पक्षी मित्रांनी सांगितले.