होमपेज › Marathwada › 'वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार'

'वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी 

मराठवाड्याला पाणीदार बनवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली असून पाणी वाटपात उत्तम कामाद्वारे जगात आपली ओळख देणाऱ्या इज्राईल सरकारच्या सहकार्‍याने मराठवाडा वाटर ग्रीडचे काम सुरू  झाले आहे. ते  पूर्णत्वास गेल्यास मराठवाडा दुष्काळमूक्त होईल व येथील  एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी लातूर येथे केले.

लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्प भूमी पूजनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे मंत्री  पियूश गोयल होते. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार विनायकराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव, आमदार सुरजितसिह  ठाकूर, अभिमन्यू पवार, रमेश कराड , गोविंद केंद्रे, महापौर सुरेश पवार,  जिल्हाधकारी जी. श्रीकांत, मध्य रेल्वेचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले विकासवंचीत विदर्भ व मराठवाड्याची व्यथा-वेदना एकच आहे. इथल्या मन व मनगटांनी बळ आहे परंतु संधीची व्यासपिठे उपलब्ध नाहीत. तिच देणे व उभारणे हा सरकारचा अजेंडा आहे. लातुरचा  रेल्वे बोगी प्रकल्प त्याचीच साक्ष आहे. अवहघ्या दोन महिन्याच्या आत मंजूरी मिळालेला व भूमीपूजनही झालेला हा कारखाना ही रेल्वेच्या इतिहासातील पहिली घटना आहे. यापूर्वी रेल्वे मंत्री परराज्यातले होते. आता ती संधी महाराष्ट्राला मिळाली त्याचे सोने महाराषट्र करुन इथे तयार होणारे सर्व मेट्रो कोच महाराषट्र विकत घेईल, लातूरच्या विकासाचा पॅटर्न जगाला दाखवीन असेही ते म्हणाले. 

 पोर्टची कनेक्टीव्हीटी नसल्याने मोठे कारखाने मराठवाड्यात येत नाहीत. ही अडचन दूर व्हावी यासाठी नागपूर – मुंबई समृध्दी जलद महामार्गाची निर्मिती केली. मराठवाड्यातील आठही जिल्हे या मार्गाने जोडले गेले आहेत. त्यामुळे आद्योगिक विकासाला गती मिळणार असून पुणे- मुंबईसारखे उद्योग आता मराठवाड्यात उभारले जाणार आहेत. रोजगार उपलब्धही होणार आहे. या मार्गाच्या माध्यमातून येत्या दोन वर्षात मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यातून सहा ते तासांत मबंई गाठणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री पियूश गोयल यानी  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पपने मूळे आता लातूरात मेट्रो कोच प्रकल्प उभारला जात असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पामूळे लातूरची ओळख औद्योगिक नगरी म्हणून होईल असा विश्वास व्यक्त करुन प्रकल्पामूळे त्याच्याशी निगडीत असलेले अनेक उद्योग उभारले जाणार असल्यामूळे मोठ्या प्रमाणात रोजगांराची संधी प्राप्त होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या

जलद, कुशल व व्यापक (स्पिड,स्किल व स्केल) या भूमिकेमूळे विक्रमी वेळेत उभा होईल अशी ग्वाही दिली. संभाजीराव पाटील यांनी आजचा दिवस हा आपल्या जीवनातील सर्वाधिक आनंदाचा दिवस असल्याचे सांगितले. , पंकजा मुंढे, खा. गायकवाड यांचीही भाषणे झाली. प्रासाताविक मध्य रेल्वेचे महाप्रबंधक जे. के. शर्मा यांनी केले.


  •