होमपेज › Marathwada › लातूर : कंत्राटदाराने नळजोडणीचे पावती बुक छापले मनपाच्या नावे

लातूर : कंत्राटदाराने नळजोडणीचे पावती बुक छापले मनपाच्या नावे

Published On: Dec 13 2017 10:42PM | Last Updated: Dec 13 2017 10:42PM

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी

अमृत योजनेच्या कामातील कंत्राटदाराने मनपाच्या परवानगी विनाच नळ जोडणीचे पावती बुक मनपाच्या नावाने छापले आहे.  पावती बुक छापलीने खळबळ उडाली आहे.

मनपा पाणीपुरवठा अभियंत्यांनी य प्रकरणाचा  पंचनामा केला. स्थाईच्या सभापतीसमोर नगरसेवक विजय साबदेनी क संबंधितावर पोलिस केस करण्याची मागणी केली. त्यानंतर गुत्तेदाराला मनपाने नोटीस देण्यात आली. एकटया सोहेल नगरमधून ८० ते ९० हजार जमवून मनपा बिलकलेक्टरकडे पैसे दिल्याचा गुत्तेदाराच्या कर्मचाऱ्याने दावा केला, परंतू १० दिवसांपासून पैसे कर्मचाऱ्याकडेच आहेत. मनपात पैसे अजूनही न जमा झाल्याचे  सभापती समोर आज उघड झाले. पैसे तात्काळ जमा करण्याचे आदेश यावेळी संबंधितास देण्यात आले