Mon, Dec 17, 2018 15:04होमपेज › Marathwada › पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात

पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 1:22AMवसमत : प्रतिनिधी

शहरातील पोलिस वसाहत परिसरात अस्वछता पसरल्याने पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच वसाहतीतील घरे जीर्ण झाल्याने पावसाळ्यात घरांना गळकी लागते. वसाहत परिसराला संरक्षण भिंत नसल्याने रक्षणकर्त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसमत शहरात पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांची निवासस्थाने आहेत. त्याच्यातही अपुरी काही पोलिस कर्मचार्‍यांना भाडे देऊन घर शोधावे लागत असल्याचे चित्र आहे. पोलिस वसाहतीतील जुनी घरे जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात चक्क ती गळत असताना घरावर प्लास्टिक बांधून पावसाच्या पाण्यापासून बचाव करावा लागतो. पोलिस कर्मचार्‍यांच्या वसाहतीला संरक्षण भिंत नसल्याने सर्व परिसर उघडा आहे.

याच परिसरातून दुचाकीस्वार सैरभैर आपली दुचाकी पळवितात. वसाहत परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वछता पसरली आहे. तसेच झाडेझुडपेही वाढली असून केरकचरा पडला आहे. परिसरात नगर परिषद स्वछता करीत नसल्याने पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे.