Fri, Sep 21, 2018 07:44



होमपेज › Marathwada › मुंडे-विलासराव मैत्री आता स्मारक रूपात

मुंडे-विलासराव मैत्री आता स्मारक रूपात

Published On: Dec 19 2017 7:41PM | Last Updated: Dec 19 2017 8:02PM

बुकमार्क करा





लातूर : शहाजी पवार

राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्वश्रूत आहे. ही मैत्री आता स्मारकाच्या रुपात उभारणार आहे. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत स्मारकाला तत्वत: मंजुरी देण्यात आली.

मराठवाड्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे विलासराव व गोपीनाथ हे विरोधी पक्षात असले तरी त्‍यांचा निखळ व निर्मळ मैत्रीत तसुभरही अंतर पडले नाही. विकासाच्या नावावर त्यांनी कधीही राजकारण केले नाही. ते दोघे एका व्यासपीठावर आले की त्यांना ऐकण्यास नागरिकांना पर्वणीच वाटायची. हजरजबाबीपणा, कोपरखळ्यांनी उपस्थितांतून हशा-टाळ्यांची बरसात व्हायची. 

दो हंसोका जोडा, असे त्यांच्या मैत्रीचे वर्णन करतात. मराठवाडा विकासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावरून जात असताना विलासरावांनी जगाचा निरोप घेतला व त्यानंतर काही वर्षांत गोपीनाथ मुंडेही जग सोडून गेले. त्यांच्या अकाली जाण्याने मराठवाड्याचे नुकसान झाले आहे. त्‍यांनी विकासासाठी दिलेले योगदान लातूरकर विसरणार नाहीत. लातूरच्या नाना-नानी पार्कमध्ये विलासरावांचा पुतळा उभारण्याचे ठरले होते. स्थायीचा विषयपत्रिकेवरही तो विषर होता. सोमवारी बैठक सुरू होती. विलासरावांच्या पुतळ्यासंदर्भात विषय चर्चेला आला, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजा मणिरार रांनी विलासरावांच्या पुतळ्यासोबत गोपीनाथ यांचाही पुतळा उभारावा, असे सूचविण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे व रविशंकर जाधव रांनी त्‍यास अनुमोदन दिले. भाजपाचे नगरसेवक शैलेश गोजमगुंडे व शैलेश स्वामी यांनी विषराला मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली. 

सभापती अशोक गोविंदपूरकर रांनी तत्वत: मान्यता दिली. शैलेश गोजमगुंडे रांनी या मित्रांचे पुतळे एकत्र उभारावेत, असे सूचवले. नाना-नानी पार्कला रोज शेकडो लोक भेट देतात. लहान-थोरांच्या या आवडीच्या उद्यानात या नेत्यांचे पुतळे एकत्र उभारल्यास लातूर शहराला वेगळी ओळख मिळणार असून, निरपेक्ष मैत्रीचा वस्तूपाठही त्यामुळे पुन्हा उजळणार आहे.