'माझ्या बहिणींना त्रास द्याल तर गाठ माझ्याशी'

Last Updated: Oct 18 2019 6:15PM
Responsive image
छत्रपती उदयनराजे भोसले

Responsive image

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

माझी कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नाही. माझा पक्ष माझी जनता आहे. त्यामुळे जो जनतेच्या हिताचे काम करत असेल त्याचा मी पक्ष घेणार म्हणून मी पवारांना धोका दिला नाही माझी बांधीलकी जनतेशी असल्याचे  छत्रपती उदयनराजे यांनी परळीत सांगितले. त्याचप्रमाणे एक भाऊ विरोधात गेला, तर काय झाले मी बहिणींची पाठराखण करतोय. माझ्या बहिणींना त्रास द्याल तर गाठ माझ्याशी असल्याचा त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

भाजप महायुतीच्या प्रचारासाठी छत्रपती उदयनराजे भोसले आज (दि.१८) परळीत आले होते. शहरातील गणेशपार भागात उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा झाली. यावेळी उदयनराजे यांनी आपल्या स्टाईलने छोटेखानी भाषणातून फटकेबाजी केली. त्यांनी सांगितले की, आयर्नमॅन नरेंद्र मोदी हे देश घडविण्यासाठी काम करत आहेत. प्रत्येक समाज घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त लोकांना आडवा आणि लोकांना जिरवा हेच धोरण राबवले. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर वंचित पिडीत लोकांना न्याय देण्यासाठी काम केले. पंकजा व प्रितम या माझ्या बहिणीही त्याच मार्गाने काम करत आहेत. मग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले. 

मी भाजपत प्रवेश केल्यावर मी पवारांना धोका दिला असे म्हणणार्‍यांनी मुंडे साहेबांना कोणी धोका दिला याचे उत्तर द्यावे असा टोला त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला. या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन करुन मुंडे भगिनींना मी पाठबळ देतोय त्यामुळे त्यांना त्रास द्याल तर गाठ माझ्याशी असल्याचा त्यांनी विरोधकांना इशारा दिला.