Mon, Apr 22, 2019 12:03होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांच्या बारदाण्यात बीडमध्ये हरभरा खरेदी सुरू 

शेतकर्‍यांच्या बारदाण्यात बीडमध्ये हरभरा खरेदी सुरू 

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 12:12AMबीड : प्रतिनिधी

चालू वर्षीच्या हंगामात हरभरा खरेदी केंद्र सुरू असताना केवळ बारदाना नसल्याचे कारण सांगून हरभरा खरेदी बंद होती शासनाकडे बारदाणा नसल्याचे कारण सांगितले जात होते.  शेतकर्‍यांकडे असलेल्या बारदाण्यात हरभरा खरेदी करावा यासाठी  डॉ. योगेश क्षीरसागर यांनी  आक्रमक पवित्रा घेऊन हरभरा खरेदी करण्याची मागणी केली होती त्यानंतर आज शेतकर्‍यांकडे असलेल्या बारदाण्यात हरभरा खरेदी सुरू झाली आहे.

बीड तालुक्यातील शेतकर्‍यांनी चालू वर्षाच्या हंगामात हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले आहे. हरभरा विक्रीसाठी शासनाकडे बारदाणा उपलब्ध नसल्यामुळे ही खरेदी बंद करण्यात आली होती. शासनाने हरभरा खरेदीची मुदत वाढवून दि.13 जून पर्यंत केलेली आहे. असे असताना केवळ बारदाण्याअभावी हरभर्‍याचे माप घालता येत नव्हते ही गोष्ट लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांची भेट घेतली. ही बाब आ.जयदत्त क्षीरसागर यांना सांगताच त्यांनी संबंधीत अधिकार्‍यांना तत्काळ संपर्क साधून शेतकर्‍यांच्या उपलब्ध असलेल्या बारदाण्यात हरभरा खरेदी करून घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधिताना दिल्या. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी शेकडो शेतकर्‍यांना सोबत घेऊन जिल्हा उपनिबंधक व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांची भेट घेऊन शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. शासनाचा बारदाना उपलब्ध होईपर्यंत शेतकर्‍यांच्या बारदाण्यात हरभरा खरेदी करावा अशी मागणी केली. त्यांच्या मागणीची दखल घेत आज हरभरा खरेदी सुरू झाली असून शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. जयदत्त क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे शेतकर्‍यांना न्याय मिळाला असल्याची भावना श्रीमंत सखाराम कोकाणे, प्रसाद ज्ञानोबा ताटे, लहू श्रीराम घाटे यांनी व्यक्त केली आहे.