Mon, Nov 19, 2018 04:15होमपेज › Marathwada › भाजीपाला रस्त्यावर आल्याने, केजमध्ये वाहतुकीची कोंडी

भाजीपाला रस्त्यावर आल्याने, केजमध्ये वाहतुकीची कोंडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

केज : प्रतिनिधी

आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्याच्या कडेला भाजीपाला व फळ विक्रेत्यांना उठवण्यासाठी वाहतूक पोलिस व न. प. चे कर्मचारी गेले होते. यासाठी केजमधील भाजीपाला व फळ विक्रेते त्यांनी विरोध करत मुख्य रस्त्यावर भाजीपाला अस्ताव्यस्त फेकून नाराजी व्यक्त केली. यामुळे काही काळ बाजारासमोरील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

केज-अंबाजोगाई रोडवरील मंगळवार पेठ चौकातील मुख्य रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकणार्‍या महिला  व  गाड्यावरून फळ विक्रेते करणारे थांबून विक्री करतात.  यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अर्धा रस्ता अतिक्रमण व्याप्त होऊन अपघाताचा धोका वाढतो. तसेच मुख्य रस्त्यावर असलेले दुकानाला या भाजीपाला व फळ विक्री करणार्‍या गाड्यामुळे स्थानिक व्यवसायावर परिणाम होतो.  या कारणांमुळे वाहतूक पोलिस कर्मचारी व न. पं. चे कर्मचारी या विक्रेत्यांना उठवण्यासाठी गेले असता विक्रते, व्यापारी व कर्मचारी यांच्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

याठीकाणी बसलेले विक्रेते व व्यापारी यांनी उठण्यास  विरोध केला. त्यानंतर काही वेळातच भाजीपाला व फळे रस्त्यावर फेकून देण्यात आले. महिला विक्रेत्या मुख्य रस्त्यावर येऊन उभा राहिल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. बाजार पेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच न. पं. चे अधिक्षक कुलकर्णी व  पीआय हुंबे, नगरसेवक, पत्रकार, कार्यकर्ते यांनी बाजारस्थळावर जाऊन परिस्थिती पहाणी करून वातावरण शांत केले. 

Tags : Marathwada,. Maratheada News, vegetable,  road,  traffic jams, Cage


  •