होमपेज › Marathwada › वैद्यनाथ दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

वैद्यनाथ दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

Published On: Dec 17 2017 3:15PM | Last Updated: Dec 17 2017 3:15PM

बुकमार्क करा

परळी वैजनाथः प्रतिनिधी  

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता सात झाली आहे. आज सकाळी धनाजी राजेश्वरराव देशमुख यांचे उपचार चालू असताना निधन झाले. 

वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत १२ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने लहाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

कारखान्यातील कर्मचारी सुभाष कराड (लिंबोटा), सुमित भंडारे, सुनिल भंडारे (देशमुख टाकळी), गौतम घुमरे (गाडे पिंपळगाव), राजाभाऊ नागरगोजे (मांडेखेल), मधुकर आदनाक (धानोरा)  धनाजी राजेश्वरराव देशमुख यांचा मृतामध्ये समावेश आहे. उर्वरीत जखमींवर उपचार चालू आहेत. धनाजी देशमुख यांचे रविवारी सकाळी ९ वाजता निधन झाल्याचे घोषित करण्यात आले.