होमपेज › Marathwada › ‘एक्साईज’चा लाचखोर जवान वाघमोडे जाळ्यात

‘एक्साईज’चा लाचखोर जवान वाघमोडे जाळ्यात

Published On: Apr 16 2018 6:35PM | Last Updated: Apr 16 2018 6:35PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

स्टेट एक्साईज अर्थात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लाचखोर जवानाला आज लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. गुन्ह्यात जप्‍त केलेली दुचाकी परत करण्यासाठी त्याने पाच हजारांची लाच कार्यालयातच स्वीकारली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तुळजापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक बी. व्ही. गावडे यांनी सांगितले, की तक्रारदाराची दुचाकी एका गुन्ह्यात जप्‍त केली होती. ती परत करण्यासाठी जवान सुरेश शरद वाघमोडे याने पाच हजारांची लाच मागितली. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. याबाबत 12 एप्रिल रोजी लाच मागितल्याची खात्री झाली. त्यानंतर आज प्रत्यक्षात लाच स्वीकारताना या जवानाला कार्यालयातचं अटक करण्यात आली. निरीक्षक बी. जी. आघाव यांनी सहकार्‍यांसह ही कारवाई केली.