Mon, Nov 19, 2018 18:57होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : 'तुळजाभवानी मंदिर समितीवर विश्वस्त मंडळाची नेमणूक करा'

उस्मानाबाद : 'तुळजाभवानी मंदिर समितीवर विश्वस्त मंडळाची नेमणूक करा'

Published On: Dec 21 2017 7:49PM | Last Updated: Dec 21 2017 7:49PM

बुकमार्क करा

उस्मानाबाद : प्रतिनिधी 

पंढरपूर व अन्य देवस्थानप्रमाणेच तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर समितीवर पदसिध्द जिल्हाधिकारी ऐवजी शासन अध्यक्ष व विश्वस्त मंडळाची नेमणूक करावी, अशी मागणी नागपूर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आ. सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी (दि. २१) विधान परिषदेत केली.

विधानसभेने संमत केलेले पंढरपूर अधिनियम, १९७३ मध्ये सुधारणा करण्याकरीता विधेयक क्रमांक ६१ च्या चर्चेच्यावेळी बोलताना आ. सुजितसिंह ठाकूर यांनी विधान परिषदेत ही मागणी केली़ पुढे बोलताना आ़ ठाकूर म्हणाले,  शासनाने वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करुन पंढरपूर मंदिर समितीत सुधारणा करण्याचे विधेयक आणले. तसेच श्री. तुळजाभवानी मंदिर समितीवरही अध्यक्ष हे पदसिध्द जिल्हाधिकारी यांच्याऐवजी शासनाने अध्यक्ष व विश्वस्त असावेत अशी मागणी केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी पदसिध्द आहेत. या मंदिर समितीची घटना निझाम राजवटीपासूनची आहे. या मंदिर समितीवर जिल्हाधिकारी पदसिध्द अध्यक्ष असल्याने जिल्हाधिकारी पदावर चांगली अधिकारी व्यक्ती असेल तर चांगले काम होते.अन्यथा तुळजाभवानी मंदिर समितीवर पदसिध्द अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी हुकूमशाह पध्दतीने मनमानी कारभार करतात. भाविक भक्तांच्या तसेच नागरिक व लोकप्रतिनिधींच्या भावनांचा व सुचनांचा अनादर करुन स्वत:ला वाटेल तसे हे पदसिध्द अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी कारभार करतात. या आधी पदसिध्द अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा भाविक भक्तांसह सर्वांनाच खुप वाईट अनुभव असल्याचे आ. सुजितसिंह ठाकूर यांनी विधीमंडळात सांगितले.