Thu, Jul 18, 2019 12:36होमपेज › Marathwada › उस्‍मानाबाद : बारावीच्या विद्यार्थ्याची लोहारामध्ये आत्‍महत्‍या

उस्‍मानाबाद : बारावीच्या विद्यार्थ्याची लोहारामध्ये आत्‍महत्‍या

Published On: Dec 25 2017 9:44AM | Last Updated: Dec 25 2017 9:44AM

बुकमार्क करा

लोहारा : प्रतिनिधी

अकरावीत शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाच्या ताणामुळे राहत्‍या घरामध्ये गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना रविवारी (दि. २४) रात्री सात वाजता शहरातील बंगले प्लॉटिंग येथे घडली. याप्रकरणी लोहारा पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे. 

लोहारा शहरातील हिप्परगा रोडजवळ बंगले प्लॉटिंग येथे रेणके यांचे घर आहे. येथील विठ्ठल रेणके यांचे 8 वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर विठ्ठल यांची पत्नी रत्नाबाई या दोन मुले, दोन मुलीसह येथे वास्तव्यास आहेत. घराची परिस्थिती हलाखीची आहे. रेणके यांचा लहान मुलगा राहुल विठ्ठल रेणके (वय १९) शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. अभ्यासाचा ताण आल्याने रविवारी रात्री घरात कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री घरातील सदस्य घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मृताचे चुलत आजोबा गणपत संतराम रेणके यांनी पोलिसात तक्रार नोंद केली आहे.