Fri, Jul 19, 2019 20:00होमपेज › Marathwada › शिक्षक मागणीसाठी शाळेला ठोकले टाळे

शिक्षक मागणीसाठी शाळेला ठोकले टाळे

Published On: Jan 18 2018 8:04PM | Last Updated: Jan 18 2018 8:04PMलोहारा : प्रतिनिधी 

तीन वर्षांपासुन अनेक वेळा मागणी करूनही इंग्रजी विषयाचे शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरूवारी (दि.18) जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले. ही घटना उस्‍मानाबाद मधील भातागळी याठिकानी घडली.

भातागळी येथे जिल्हा परिषदेची पाचवी ते दहावीपर्यंत शाळा आहे. परंतु या शाळेला गेले दीड वर्षापासून इंग्रजी विषयाचे शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. इंग्रजी विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परीषदेच्या शिक्षण धिकाऱ्यांच्या दालनात आठ जानेवारी रोजी नववी व दहावीची शाळा भरवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळे शिक्षणाधिकारी व पदाधिकारी यांनी ग्रामस्थांना इंग्रजी विषयाचा शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. मात्र दहा बारा दिवस लोटले तरी अध्याप शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरूवारी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकून आंदोलन केले. यावेळी गटशिक्षण अधिकारी टी.एच.सय्य़दा यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन शनिवारपर्यत इंग्रजी विषयाचा शिक्षक देण्याचे लेखी अश्वासन दिल्यानंतर दुपारी एक वाजता शाळेचे कुलूप उघडण्यात आले. मात्र शनिवारपर्यत शाळेला शिक्षक नाही मिळाला तर मंगळवारी  गटशिक्षण कार्यालयालाच टाळे ठोकणार असल्याचा इशारा  ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी सरपंच दैवशाला भंडारे, उपसरपंच तानाजी आनंदगावकर,  शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आरती जगताप, अमोल ओवांडकर, दत्ता उमाटे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थितीत होते.