Sat, Apr 20, 2019 10:37होमपेज › Marathwada › उस्‍मानाबादमध्ये महिलेची धिंड : जवानाला अटक

उस्‍मानाबादमध्ये महिलेची धिंड : जवानाला अटक

Published On: Dec 23 2017 2:11PM | Last Updated: Dec 23 2017 2:11PM

बुकमार्क करा

मुरुम : प्रतिनिधी

आलूर (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे पत्नीची बदनामी करीत असल्याच्या संशयाने भारतीय सैन्य दलाच्या जवानाने  भावकीतील महिलेची गावातून धींड काढली. संबंधित महिलेच्या फिर्यादीवरुन जवानाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री मुरुम पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सुटीवर आलेल्या जवानाने हे कृत्य केले. तो संबंधित महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढत असताना गावातील काही जणांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्‍याच्याकडून दमदाटी करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर गावात यावरुन तणाव होता. संबंधित जवानाच्या नात्‍यातीलच ही महिला असल्याने इतरांनी या प्रकरणात हस्तक्षेप करणे टाळले. अखेर संबंधित महिलेने मुरुम पोलिसात फिर्याद दिल्यानंतर जवानाल अटक करण्यात आली आहे. यातील आणखी तिघांची चौकशी सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.