Mon, Jun 17, 2019 18:17होमपेज › Marathwada › माजलगाव तालुक्यात 12 गावांना तडाखा

माजलगाव तालुक्यात 12 गावांना तडाखा

Published On: Feb 12 2018 2:49AM | Last Updated: Feb 12 2018 2:42AMमाजलगाव : प्रतिनिधी  

रविवारी सकाळी अवकाळी गारपिटीने मारा केल्याने होते नव्हते ते पीक हातचे गेल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. जवळपास 12 गावांना याचा तडाखा बसला आहे.
  गेल्या चार दिवसांपासून बदललेल्या वातावरणाचा मोठा फटका रविवारी पहाटेच्या सुमारास अस्मानी संकटाने दिला. हिवरा, काळेगाव,डुबाथड्डी, गव्हाणथडी, रामपिंपळगाव शिवार, सुर्डी, वारोळा याठिकाणी गारपीट आणि पावसाचा मारा झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी, ऊस यपिकांचे मोठे नुकसान झाले.  

हरभरा भुईसपाट

यंदा एकमेव भरघोस उत्पन्न मिळेल अशी आशा असलले  हरभरा पीक गारपिटीत अक्षरशः भुईसपाट झाले आहे. 

अनेक फळ बागांचे नुकसान  

रवींद्र बापमारे या शेतकर्‍यांच्या शेतातील तीन एक्कर शेतातील पपईच्या बागेचे मोठे नुकसान झाले. काळेगावथडीतील केळी उत्पादक शेतकरी मनीष तौर यांना देखील फटका बसला